आता सध्या सर्व देशभर कोविड 19 मुळ सुट्टी जाहीर झालेले आहे. ही केवळ सुट्टीच नव्हे तर घराबाहेर कुणालाही पडता येत नाही. त्यामुळे मुळात चंचल स्वभाव असणाऱ्या मुलांना खूप अडचणीचे झाले असेल. पण अशाही परिस्थितीमध्ये आपले जे काही छंद आहेत ते जोपासत हा कंटाळवाणा वाटणारा वेळ आपण मार्गी लावू शकतो. जी आपण अगोदर नियोजन केलेली कामे झाली नसतील साहाजिकच घरी बसून करण्यासारखी ती कामे आपण पूर्ण करू शकतो. आपण जे काय ठरवलं होत, पण पूर्ण करता आलं नाही ते वाचन आपण पूर्ण करून घेऊ शकतो. संगीताच्या क्षेत्रात असणारी मुलं व्यवस्थित रियाज करू शकतात. त्याच बरोबर चित्र काढणे किंवा पेंटिंग हेही पूर्ण करून घेऊ शकतो. न समजलेली काही अभ्यासक्रमातील प्रकरणे असतील ते आपल्याला विविध माध्यमातून समजून घेता येऊ शकतात. आपले मित्र पै पाहुणे यांची खाली खुशाली व गप्पा फोनवरून करता येऊ शकतात. पण मात्र सर्वांनी घरीच राहायचं आहे व प्राप्त परिस्थितीमध्ये सरकारच्या सूचनाच पालन करायचं आहे.